आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढणार...
१ ऑगस्ट २०१९ पासून केज, अंबाजोगाई, परळी या तीन तालुक्यातील वाडी - वस्ती - तांड्यावर 'समाज प्रबोधन याना' या भागात वास्तव्य करणाऱ्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन या दीनदुबळ्या-वंचित घटकांना त्यांचे हक्क,अधिकार समजावून सांगणार आहे. भाजप सरकारच्या हुकूमशाही अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी या शोषित लोकांचे संघटन तयार करणार आहे. शेतकरी बांधवांचे रक्त पिणाऱ्या रक्तपिपासू भाजपला महाराष्ट्र राज्यातून कायमचे हद्दपार करण्याचे आव्हान येथील शेतकरी राजाला करणार आहे. शिक्षणाचे बाजारीकरण, युवकांची वाढती बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयांवर ही याना समाजाचे प्रबोधन करून अठरापगड समाजाला स्वाभिमानी समाज बनवणार आहे. ही याना पहिल्या टप्प्यामध्ये केज, अंबाजोगाई, परळी या तीन तालुक्यातील वाडी-वस्ती- तांड्यावरून १ऑगस्ट २०१९ रोजी निघणार आहे. हे तीन तालुके पिंजून काढल्यानंतर याचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. शाहू-फुलेआंबेडकरांच्या महाविचारांचा महाराष्ट्र घडविणे, हा या समाज प्रबोधन यानेचा उद्देश आहे. या वैचारिक यात्रेला अनेक | स्तरांमधून शुभेच्छा मिळत आहेत. निस्वार्थी हेतूने निघणाऱ्या या समाज प्रबोधन यान्नेला दर्पण न्यूज परिवाराकडूनही खुप साऱ्या शुभेच्छा... विशेष म्हणजे, या यानेचं नेतृत्व करतीय एका शेतकऱ्याचा २२ वर्षीय तरुण मुलगा....
छयपती शिवाजी महाराजांचे रवराज्य डोळ्यासमोर ठेऊन आणि डॉ.बाबाराहेब आंबेडकरांनी लिहलेले भारताचे संविधान माझ्या सोबत घेऊन मी या जुलूमी सरकारी त्यवरथेशी समाज प्रबोधन यात्रेच्या माध्यमातून लढणार . तरुण मित्रांनो, राजकीय नेत्यांचे गुलाम बनण्यापेक्षा क्रांतिकारक भगतसिंशय बना. या समाज प्रबोधन यामध्ये सहभागी व्हा.... समाज प्रबोधन यात्रा प्रमुख