अंबाजोगाई: दोन चपाती, भात, एक भाजी, वरण आणि चवीला लोणचं तसेच सोबतीला स्वच्छ थंड प्यायला जारचे पाणी. एवढं सगळं जेवण फक्त २० रुपये किंमतीला अंबाजोगाई शहरामध्ये गोरगरीब जनतेला मिळत आहे. हा आगळा-वेगळा उपक्रम अँड. विशालजी घोबाळे आणि जीवन वेलफेअर फॉउंडेशन गेल्या महिनाभरापासून दीनदुबळ्या लोकांसाठी राबवत आहेत. भुकेलेल्यांना माफक दरात पौष्टिक अन्न मिळाले पाहिजे हा या मागचा हेतू आहे. हे अन्नछत्र अंबाजोगाई शहरामध्ये स्वामी रामानंद तीर्थ या सरकारी रुग्णालयासमोरील अरुणकुमार वैद्य चौकाच्या बाजूला दररोज नियमित चालू आहे. या उपक्रमाचा सर्वसामान्यांना लाभ होत आहे.
अंबाजोगाईत मिळतेय गोरगरिबांना वीस रुपयात पोटभर जेवण अँड. विशालजी घोबाळे आणि जीवन वेलफेअर फॉउंडेशनचा स्तुत्य उपक्रम...